Ad will apear here
Next
संजीवनी उपक्रमाला कॉर्पोरेट सीएसआर पुरस्कार प्रदान
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ‘बीएफआयएल’चे चीफ पीपल ऑफिसर श्रीनिवास रेड्डी वुदुमुला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एम. आर. राव

नवी दिल्ली : भारत फायनान्शिअल इन्क्लुजन लिमिटेडच्या (बीएफआयएल) ‘संजीवनी’ या सामाजिक उपक्रमाला ‘आव्हानात्मक परिस्थितीमधील सीएसआर (पूर्व) २०१९’ या कॉर्पोरेट सीएसआर पुरस्काराने गौरवण्यात आले. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातर्फे समाजामध्ये परिवर्तनात्मक परिणाम घडवणाऱ्या कंपन्यांना हा पुरस्कार दिला जातो. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या समारंभामध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘बीएफआयएल’चे चीफ पीपल ऑफिसर व सीएसआर प्रमुख श्रीनिवास रेड्डी वुदुमुला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एम. आर. राव यांनी हा  पुरस्कार स्वीकारला.  

‘संजीवनी’ या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध केल्या जातात. यामधील ‘डॉक्टर-अॅट-डोअरस्टेप’ या अॅप-आधारित सुविधेचा वापर करून, कोणत्याही शेतकऱ्याला टोल-फ्री क्रमांकावर कॉल करता येतो आणि गुरांवरील उपचार, इमर्जन्सी केअर, लसीकरण, आदीबाबतीत सेवा मिळवता येऊ शकते.  

या वेळी बोलताना, बीएफआयएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एम. आर. राव म्हणाले, ‘हा पुरस्कार मिळणे हा आमचा मोठा सन्मान आहे. ग्रामीण भारतातील रोजगाराला पाठिंबा देण्यासाठीची आमची बांधिलकी आणि केवळ क्रेडिट पुरवण्यापलीकडेही सेवा देण्याचा आमचा प्रयत्न या पुरस्काराने अधोरेखित झाला आहे. ‘बीएफआयएल’ भारतातील २० राज्यांतील एक लाखांहून अधिक गावांमध्ये काम करत आहे. ग्रामीण भागातील लोकांबरोबर काम करण्याचा आमचा अनुभव आणि त्यांच्या गरजांचे आकलन यामुळे संजीवनी उपक्रम साकार होण्यास मदत झाली. २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाव्दारे झारखंड, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश येथील ७१ जिल्ह्यांतील आठ लाख शेतकरी व नऊ लाखांहून अधिक गुरे यांना सेवा दिली आहे. हा कार्यक्रम भारतातील अन्य राज्यांतही विस्तारला जाईल, अशी अपेक्षा आहे.’

‘संजीवनी उपक्रम ‘१०८’अॅम्ब्युलन्स सेवेशी निगडित असून, ती ग्रामीण भागातील जनावरांसाठी आहे, इतकाच फरक आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना गुरांवरील उपचारासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागत होती व पात्र नसणाऱ्या व्यक्तींकडून उपचार करून घ्यावे लागत होते. त्यातून त्यांची सुटका झाली आहे,’ असं ‘बीएफआयएल’चे चीफ पीपल ऑफिसर व सीएसआर हेड श्रीनिवास रेड्डी वुदुमुला यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZRWCF
Similar Posts
‘ग्रामीण भागातील कुटुंबांना वार्षिक १८ हजार रुपये द्यावेत’ नवी दिल्ली : शेतीशी निगडीत गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणीयन यांनी प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला अर्ध-सार्वत्रिक मूलभूत ग्रामीण उत्पन्न म्हणून दर वर्षी १८ हजार रुपये द्यावेत. यातून जे खरेच आर्थिकदृष्ट्या संपन्न असतील त्यांना वगळावे. असा प्रस्ताव एका शोधनिबंधाद्वारे मांडला आहे
‘नवभारत निर्मितीच्या मार्गावर जाणारा अर्थसंकल्प’ नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी, पाच जुलै रोजी त्यांचा पहिला अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात शेती, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, गरिबांना सोयी-सुविधा, संशोधन, डिजिटल अर्थव्यवस्था, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला आहे. ‘हा
माती-पाण्याविना शेती; नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांची मुले दुबईला पुणे : माती व पाण्याशिवाय केवळ हवेतील प्राणवायूवर केल्या जाणाऱ्या शेतीचे ‘एरोपोनिक्स’ हे नवीन तंत्रज्ञान अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेने मंगळावर शेती करण्यासाठी विकसित केले आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी पुण्यात शिकणारी शेतकऱ्यांची पाच मुले दुबईला जात आहेत. गणेश अहेर, सौरभ चौधरी, अबूबाकर शेख, मदिपल्ली
अर्थव्यवस्थेचा विकासदर गाठणार तीन वर्षांचा उच्चांक नवी दिल्ली : उत्पादन, कृषी आणि बांधकाम क्षेत्रातील तेजीमुळे २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज केंद्रीय सांख्यिकी विभागाने (सीएसओ) वर्तवला आहे. तेवढी पातळी गाठल्यास हा विकासदर गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक असेल.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language